135: अतुल कुलकर्णी आणि 'द इंग्लिश टीचर'!
Storytel India
Narrador Storytel Marathi
Editora: Storyside IN
Sinopse
भारतीय इंग्रजी साहित्याला जागतिक प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणारे महान लेखक म्हणजे आर.के. नारायण. `द गाइड` ही कादंबरी, 'मालगुडी डेज', 'स्वामी' या मालिकांमुळे सर्वांच्या मनामनांत रूजलेल्या नारायण यांची आणखी एक गाजलेली कादंबरी म्हणजे 'द इंग्लिश टीचर'. हीच कादंबरी स्टोरीटेल घेऊन येत आहे अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या भारदस्त आवाजात... ही कादंबरी अतुल कुलकर्णींच्या आवाजात ऐकणं हे आपल्या श्रोतृवर्गासाठी एक अविस्मरणीय पर्वणी असणार आहे. या कादंबरीच्या अभिवाचनाचा अतुल कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, यावर त्यांनी चर्चा केली आहे स्टोरीटेलचे राहुल पाटील यांच्याशी. या रविवारी म्हणजेच उद्या स्टोरीटेल 'ऐकू आनंदे दिन' साजरा करत आहे. यानिमित्ताने सकाळी ७.३० पासूनच विविध मान्यवरांचे विचार, मतं, मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना स्टोरीटेलच्या युट्यूब पेजवर बघता येतील. याशिवाय या आठवड्यात कोणती पुस्तकं तुमच्या भेटीस येणार आहेत यावर चर्चा केली आहे संतोष देशपांडे व प्रसाद मिरासदार यांनी. ऐकू आनंदे बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA (https://www.youtube.com/channel/UC8oZT0ZLQalcvst62oq79SA) 'द इंग्लिश टीचर' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/2122261-The-English-Teacher सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Duração: aproximadamente 1 hora (00:48:35) Data de publicação: 16/01/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

