Chiru
Nabha Keskar
Erzähler Meghna Barve
Verlag: Nabha Keskar
Beschreibung
चिरू ही एका स्वप्नाळू मुलाची गोष्ट. तो जिज्ञासू आहे, भावनाशील आहे. समजूतदार आहे. अर्थार्जनासाठी हात पसरून भीक मागणे या पिढीजात व्यवसायाबद्दल मात्र त्याला चीड आहे . पण ती सांगावी कोणाला? त्याला स्वप्नात रमायला आवडतं. समाजातल्या तथाकथित श्रीमंतीची त्याला कल्पना नाही, पण आपल्या आणि समाजातल्या त्या वर्गातली तफावत अस्वस्थ करून जाते. किशोर वय, चुणचुणीत व्यक्तिमत्व आणि तुकडाभर भाकरीसाठी मनाला कोंडून ते भीक मागणं, या साऱ्याचा मेळ बसविण्याचा अखंड प्रयत्न चालू असतो. आणि अश्यात एका अनोळखी व्यक्तीची फक्त शाब्दिक मदत दिलासा देऊन जाते. त्यातून उभं राहतं एक छोटंसं टुमदार स्वप्न. चिरू त्या स्वप्नानं झपाटून जातो, आणि आयुष्य एक वळण घेऊ लागतं. कसा असेल तो प्रवास? काय गवसलं चिरु ला त्यात? जाणून घ्यायचं असेल तर नक्की ऐका “चिरू”... एक थक्क करणारा जीवनप्रवास............ नभा केसकर लिखित दीर्घकथा, "चिरू " मेघना बर्वे यांच्या आवाजात.
Dauer: etwa 3 Stunden (02:41:55) Veröffentlichungsdatum: 30.03.2025; Unabridged; Copyright Year: — Copyright Statment: —

