Naivedya
Darshan Desale
Narrador Leena Bhagawat
Editorial: Storytel Original IN
Sinopsis
"उद्या आपली देवी, आपली आई येणार आहे तिच्यासाठी नैवेद्याची तयारी करावी लागेल.""आज रात्रीच सर्व तयारी करून ठेऊ. आज एकाला कैद करून उद्या त्याचा नैवद्य देऊ." जंगलातल्या रात्रीच्या किर्रर्र अंधारात ते दोघं बोलत होते. त्यांचे हिरवे डोळे अंधारात चमकत होते. ती माणसं नव्हती, आणि जनावरंही नव्हती. नैवेद्याच्या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद चमकत होता . "हीच वेळ आहे नैवेद ताब्यात घ्यायची." त्यांच्यातला एकजण दुसऱ्याला म्हणाला. आणि ते त्यांच्या चार पायांवर धावत रस्त्याच्या दिशेने निघाले. त्या जन्गलातून जाणाऱ्या बसच्या दिशेने. त्यांना त्यांचा नैवेद्य सहज मिळेल की बळजबरी करावी लागेल ? ऐका खिळवून ठेवणारी ही भयकथा ...
Duración: alrededor de 1 hora (01:08:14) Fecha de publicación: 05/02/2021; Unabridged; Copyright Year: 2021. Copyright Statment: —

