Maitra
Pu La Deshpande
लेखन, अभिनय, संगीतादी कला, वक्तृत्व अशा अनेक प्रांतात स्वच्छंद संचार करणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्याकडे मैत्रीची श्रीमंतीही भरपूर होती. या समृद्धीलाच त्यांनी या पुस्तकात शब्दबध्द केले आहे. केसरबाई केरकर, नानासाहेब गोरे, पंडित विष्णू दिगंबर, खानोलकर, गौरकिशोर घोष, शाहूमहाराज, माटे मास्तर, दादा धर्माधिकारी, ज्योत्स्ना भोळे,
तसेच मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष, वसंत सबनीस, अशा अनेक थोरांशी जुळलेल्या स्नेहातून, आपुलकीतून हे सुंदर शब्द उमटले आहेत. या भावबंधामधून व्यक्तीमत्व उभी राहिली आहेत. या व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्ये, गुण, त्यांच्या कलेची महती, कामावरील- साहित्य-कलेवरील श्रद्धा यांचा वेधही पुलंनी घेतला आहे.
पु.लं. च्या पूर्वप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह म्हणजेच 'मैत्र'....
'मैत्र' पुस्तक भाई म्हणजेच पु.ल. यांनी विषयाचा अनुसरुन त्याचे मित्र 'नंदू नारळकर', 'मनू गर्दे', 'दत्तू गर्दे' यांच्या मैत्रीला अर्पण केले आहे.
Ver libro