53: युगंधर- झलक
Storytel India
Narrateur Storytel Marathi
Maison d'édition: Storyside IN
Synopsis
युगंधर मलाही आज बोललंच पाहिजे!! असं चमकू नका! असं दचकू नका! 'शिष्टाई' करणारा, पट्टीचा संभाषणचतुर म्हणून तुम्ही मला चांगलंच जाणता. त्यासाठी सावध होऊ नका. साशंक तर मुळीच राहू नका. मी कसलीही 'शिष्टाई' आज करणार नाही. कसलंही चतुर समर्थन मी मुळीच देणार नाही. मग मी बोलणार आहे तरी का? कसं आणि कशासाठी ? माझी 'गीता' युगानुयुगं तुम्ही ऐकलीत. वर्षानुवर्ष माझी 'उद्धवगीता' अभ्यासलीत. माझ्या जीवनाची म्हणून एक 'कृष्णगीता' आहे. ती मला कुणालातरी सांगायची आहे. कुणालातरी का - सर्वांनाच कधीतरी सांगायचीय हे मात्र कुणीच ध्यानी घेतलेलं नाही. श्रीकृष्ण हा 'भारतीय' म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.!त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं 'युगंधरी' दर्शन शक्य आहे, हे 'मृत्युंजय'कारांनी जाणलं.आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून,डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती-'युगंधर'!! स्टोरीटेलतर्फे आलेल्या एका अक्षर-यागाची... 'युगंधर'ची झलक! 'युगंधर' ऐकण्यासाठी येथे क्लिक (https://bit.ly/2LbORdg) करा. ही झलक कशी आहे, हे आम्हांला आवर्जून कळवा. स्टोरीटेल वर मराठी पुस्तकांचा खजिना ३० दिवस मनमुराद ऐकण्यासाठी येथे क्लिक (http://storytel.com/marathi) करा.
Durée: 11 minutes (00:10:38) Date de publication: 13/09/2019; Unabridged; Copyright Year: 2019. Copyright Statment: —

