जयवंती ची काव्यधारा - 'जयवंतीची काव्यधारा'
मसाप अंबाजोगाई
Casa editrice: Pencil
Sinossi
About the book:'जयवंतीची काव्यधारा' वाचताना प्रकर्षाने 'दीपमाळ' ची आठवण होते. काळानुरूप आता जरी प्रकाशनाचं माध्यम हे इ- स्वरुपाचं असलं तरी दोन्ही काव्यसंग्रहात एक साम्य प्रकर्षाने जाणवतं की एकाच व्यासपीठावर प्रथितयश संपादन केलेले, नवोदित, लेखनाचा छंद असणारे हौशी, सामन्य गृहिणी पासून विविध क्षेत्रात कार्यरत असणारे संवेदनशील मनाचे कवकवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे. 'जयवंतीची काव्यधारा ' वाचताना जाणवतं की सर्व रचनांमध्ये कमालीची वैविध्यता आहे. मराठी बरोबरोबरच हिन्दी भाषेतल्याही रचना आहेत. मुक्तछंद, वृत्तबद्ध, पंचाक्षरी, अष्टाक्षरी, विडंबन, अभंग, गझल,वात्रटिका अशा अनेक प्रकारातल्या रचनांचा समावेश जयवंतीच्या काव्यधारा मध्ये आहे. तरुणांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच रचना या संग्रहात समावेश आहेAbout the author:अंबाजोगाई ह्या शहराची ओळख सांस्कृतिक शहर अशी आहे. आद्य कवी मुकूंदराज यांची ही भूमी! अंबाजोगाईच्या मातीत जन्मलेला किंवा माझ्या सारखं,अंबाजोगाईच्या मातीत रुळलेला कुणीही, रसिक असणारच अशी माझी धारणा आहे. आणि या धारणेला रास्त ठरवतो तो या जयवंतीच्या काव्यधारेचा उगम! अंबाजोगाई ह्या शहराची ओळख सांस्कृतिक शहर अशी आहे. आद्य कवी मुकूंदराज यांची ही भूमी! अंबाजोगाईच्या मातीत जन्मलेला किंवा माझ्या सारखं,अंबाजोगाईच्या मातीत रुळलेला कुणीही, रसिक असणारच अशी माझी धारणा आहे. आणि या धारणेला रास्त ठरवतो तो या जयवंतीच्या काव्यधारेचा उगम!
